पवारांचा सल्ला अन ठाकरे गटाने ट्विटरवरून धनुष्यबाण हटवले
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. पण सत्तांतर झाल्यानंतर पवारांचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटामध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने आता आपल्या ट्वीटर अकाऊंट आणि वेबसाईटवरून धनुष्यबाण चिन्ह हटवलं आहे.
उद्धव ठाकरे गटाने नाव आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर आता पक्षकार्यालय आणि इतर ठिकाणावरून नाव आणि चिन्ह बदलण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे गटाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट आणि पक्षाच्या वेबसाईटवरून धनुष्यबाण चिन्ह डिलीट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक, रेड टिक सगळंच निघणार आहे. उद्धव ठाकरेंबाबत सगळंच बघायला मिळणार आहे, त्यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत.
'हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला. काँग्रेसचं गाय-वासरू चिन्ह होतं, पण त्यांनी पंजा घेतला, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही, कारी दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील,' असं म्हणत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.