Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसेनेला योग्य वाटा देऊ : देवेंद्र फडणवीस

शिवसेनेला योग्य वाटा देऊ : देवेंद्र फडणवीस मुंबई : खरा पंचनामा 

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद घातली आहे. आणि त्यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली आहे. शाह यांच्या वक्तव्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शाह यांच्या विधानाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे शिवसेनेला योग्य वाटा देऊ असे सांगितले आहे. 

त्यामुळे शिंदे गटाला काय मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. इतकेच नव्हे तर शिवसेना आणि भाजप युतीत फुट पडण्याची शक्यतादेखील राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी दोन ओळीतच उत्तर दिलं. 

शिवसेनेला किती जागा मिळणार यावरं फडणवीस यावेळी स्पष्ट बोलले. कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये या करिताच काल स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदारही आमच्या मंचावर होते. शाह यांनी बोलताना मोदींच्या पारड्यात म्हणताना इंडिया म्हटलं आहे. आणि आमचा फॉर्मुला ठरला आहे. तो आम्ही योग्य वेळी जाहीर करु. त्यामुळे कोणता गोंधळ तयार करु नका. योग्य रिप्रेझेंटेशन जसं मागच्या काळात शिवसेनेला मिळायचं तसचं रिप्रेझेंटेशन शिवसेनेला मिळत राहिलं. असं फडणवीस स्पष्टचं बोलले. 

यापूर्वी महाराष्ट्र भाजपने राज्यात मिशन ४५ चा नारा दिला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात रालोआ ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता. आज शाहांनी ४८ जागांचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला वरच्या फक्त तीन जागा मिळतील का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.