Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हॉटेलमध्ये तोडफोड : अकरा जणांना अटक

हॉटेलमध्ये तोडफोड : अकरा जणांना अटक 



सांगली : खरा पंचनामा 

विश्रामबाग येथील हसनी आश्रमजवळील हॉटेल आर्यामध्ये तोडफोड करणाऱ्या अकरा जणांना अटक करण्यात आली. यापुर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. अकरा जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

गणेश पाटील (३४, रा. वान्लेसवाडी), बाबासाहेब उर्फ बापशा चव्हाण (३४, रा. वानलेसवाडी), विनायक दुधाळ (३४, रा. स्वामी समर्थ कॉलनी), जयकिसन उर्फ बबलु माने (३१, रा. वानलेसवाडी), मल्लाय्या मठपती (२९, रा. बेथेलहेमनगर नगर, मिरज), बिरू गडदे (२८, रा. जत), राहुल रूपनर-दुधाळ (२२, वानलेसवाडी), नदीम शेख (३५, रा. गजराज कॉलनी), राजकुमार पुजारी (३२, रा. वानलेसवाडी), अवधुत दुधाळ (२१, वानलेसवाडी), नितीन शिंदे (३०, रा. सांगलीवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापुर्वी सोहेल शेख, अजित अलगुरे, राकेश वाठार यांना अटक करण्यात आली होती. 

हसनी आश्रम परिसरातील हॉटेल आर्या परमिट रूम हे आकाश शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी महेश कर्णी यांच्याकडून भाडे तत्त्वावर चालविण्यास घेतले आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी आकाश शिंदे हॉटेलमध्ये असताना संशयित सातजण त्याठिकाणी आले. त्यांनी, ‘आम्हाला फुकट जेवण पाहिजे,’ असे म्हणत ५० हजारांची खंडणी त्यांनी मागितली. यावेळी शिंदे यांनी पैसे आणि जेवण देण्यास नकार दिला. यावेळी संशयितांनी, ‘तू इथे धंदा कसा करतो हे बघतोच,’ असे म्हणत तेथून निघून गेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी शिंदे हे गणेश पाटील याच्याकडे झालेल्या घटनेबाबत जाब विचारल्यानंतर संशयिताने दमबाजी केली. 

दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास हॉटेलमध्ये काहीजण लोखंडी रॉड घेऊन तोडफोड करत असल्याचे कामगार राजू सोनंद याने फिर्यादींना सांगितले. फिर्यादी यांनी तातडीने सारा प्रकार सीसीटीव्हीत पाहिला. त्यावेळी गणेश पाटीलचे साथीदार हे दिसून आले. त्यानंतर पावणेसातच्या सुमारास पुन्हा संशयितांनी हॉटेलमध्ये तोडफोड करण्यास सुरवात केली. संशयितांनी हॉटेलमधील दोन ते अडीच लाख रुपयांच्या साहित्याची तोडफोड केली. तसेच गल्ल्यातील २२ हजारांची रक्कमही चोरी केली. 

विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली. त्यानंतर आता पुन्हा अकरा जणांना अटक केली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.