Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत प्रार्थनास्थळाच्या वादातून मारामारी; १४ जणांवर गुन्हा

सांगलीत प्रार्थनास्थळाच्या वादातून मारामारी; १४ जणांवर गुन्हासांगली : खरा पंचनामा

सांगली-कुपवाड रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाच्या कारणावरुन मारामारी झाली. या मारामारीत दोन्ही गटाकडील सहाजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून संजयनगर पोलिसांनी एकूण १४ संशयीतांवर गुन्हा दाखल केला आहे.

एका प्रार्थनास्थळाच्या वादातून शनिवारी रात्री एकदा सव्वाआठ वाजता आणि त्यानंतर दहा वाजता अशी दोन वेळेला दोन गटात मारामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही बाजूनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. रामचंद्र कोष्टी यांनी प्रार्थनास्थळाबाबत दाखल केलेला दावा आणि त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्‍यांच्या बाबतीत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरुन आपल्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले आहे. संशयीत यासीन नदाफ, हुजेफ चौधरी, साकीब  चौधरी, इरफान नदाफ, आस्लम मुजावर, आयशा चौधरी, शायरा चौधरी, अंजुम चौधरी, शकील चौधरी, रफीक चौधरी (सर्व रा. सांगली) आदींनी काठ्या आणि लोखंडी पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात रामचंद्र कोष्टी, श्रीकांत कोष्टी आणि सुनिता कोष्टी हे जखमी झाले आहेत, असे कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्याच परिसरात राहणाऱ्या यासीन इकबाल नदाफ यांनीही कोष्टी यांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास यासीन हे हुजेक चौधरी आणि साकीत चौधरी हे उभे होते. त्यावेळी संशयीत श्रीकांत कोष्टी हा यासीन यांच्याजवळ आला. त्याने जाब विचारला. त्यानंतर धक्काबुक्की करुन यासीन यांना खाली पाडले. त्यानंतर घरातून लोखंडी पाईप आणून यासीन यांच्या पाठीवर, उजव्या गुडघ्यावर हल्ला केला. त्या दोघांत मारामारी सुरु झाल्याने हुजेफ आणि साकेब चौधरी यांनी पुढे होऊन त्यांच्यातील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहुन श्रीकांत कोष्टी याचे वडील रामचंद्र, त्याची आई सुनिता आणि पत्नी स्वप्नाली आदींनी धावत येवून यासीनसह तिघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली,

संजयनगर पोलिसांनी या मारामारीची गंभीर दखल घेऊन संशयीतांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी त्या परिसराला भेट दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.