Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दोन दुचाकींच्या धडकेत वृध्द ठार

सांगलीत दोन दुचाकींच्या धडकेत वृध्द ठार



सांगली : खरा पंचनामा

सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर समोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एक वृद्ध जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. 

माधव लक्ष्मण जोशी (वय ८० रा. रुक्मिणीनगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील बसवराज जिनाप्पा कावळे (वय २३ रा. कर्नाटक) हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली.

मृत माधव जोशी हे मुंबईतील शिपयार्डमध्ये एका कंपनीत काम करत होते. निवृत्तीनंतर ते कोल्हापूर रस्त्यावरील रुक्मिणीनगर येथे एकटेच राहत होते. जोशी आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची मोपेड  (एमएच 10 डिके 3645) वरून सांगलीकडे येत होते. याचवेळी बसवराज कावळे दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. कोल्हापूर रोडवरील हॉटेलसमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात जोशी हे रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज कावळे याने हेल्मेट घातल्याने त्याला किरकोळ मार लागला.   

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.