Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेअर मार्केट फसवणूक : पिनॉमिकच्या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

शेअर मार्केट फसवणूक : पिनॉमिकच्या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढसांगली : खरा पंचनामा

शेअर मार्केटच्या माध्यमातून दीडपट रक्कम परतावा देण्याचे आमिषाने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी कंपनीच्या तिघांच्या पोलिस कोठडीत तीन मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने पंकज पाटील, अभिजीत जाधव, संतोष घोडके या तिघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांचीही पोलिस कोठडी वाढविली.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून गुंतवणूकदारांकडून पैसे घेत त्यांचा मोबदला न दिल्याने संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहे. पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपीसह विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्यानंतर दहा महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला नाही. यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात संशयित पंकज पाटील व अन्य दोघांना अटक करण्यात आली होती. 

अद्यापही या कंपनीच्या संचालकांनी कोणाकडून पैसे घेऊन ते परत देण्यात आले नसल्यास अशा गुंतवणूकदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.