Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बलात्काराची केस मागे घे; एपीआयची न्यायालय आवारात धमकी

बलात्काराची केस मागे घे; एपीआयची न्यायालय आवारात धमकी पुणे : खरा पंचनामा 

बलात्काराच्या गुन्ह्याची दाखल केलेली केस मागे घे, नाही तर तुला खल्लास करुन टाकीन अशी धमकी एपीआयने फिर्यादीला दिली आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय आवारात ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चंद्रकांत भगवान माने (वय ५३, रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) या एपीआयवर गुन्हा दाखल केला आहे. 

चंद्रकांत माने हा सध्या सोलापूर येथील प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. फिर्यादी आणि एपीआय माने एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चंद्रकांत माने हा पुण्यात असताना त्याची फिर्यादीशी ओळख झाली होती. त्यातून त्याने त्यांच्यावर बलात्कार केला होता. याबाबत पीडित महिलेने २०२० मध्ये समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच सोलापूर शहर पोलीस दलातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याविरोधात चंद्रकांत माने याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

चंद्रकांत माने याने १७ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला फोन करुन शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील कॅन्टिनमध्ये बोलावून घेतले. त्या तेथे पोहचल्यावर त्याने बलात्काराची फिर्याद मागे घे, नाही तर तुला खल्लास करुन टाकीन, माझी वरपर्यंत पोहोच आहे. तुझ्यामुळे हायकोर्टात केस पेंडिंग पडली आहे, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.