सांगलीचे चित्रपट अभिनेते महेश कोळी यांची मराठी चित्रपट परीक्षण समितीच्या सदस्यपदी निवड
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील अभिनेते, लेखक आणि निर्माते महेश कोळी यांची मराठी चित्रपट परीक्षण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबतचा शासन आदेश दि. २५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केला आहे.
या समितीत ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचेसह इतर काही अशासकीय सदस्य देखील आहेत. यात सांगलीतील कलाकार महेश कोळी यांची निवड करण्यात आली आहे. मराठी चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदानाची तरतूद आहे. हे अनुदान मंजुर करण्यापूर्वी त्या चित्रपटाचे निरीक्षण आणि शिफारस करण्याचे काम ही समिती करीत असते.
महेश कोळी यांनी अनेक मराठी चित्रपट, टीव्ही सिरियल आणि नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. तसेच 2007 साली त्यांना शॉर्ट फिल्म करिता प्रसार भारती युनिसेफ चे अवॉर्ड देखील मिळाले आहे. तसेच अनेक जाहिरात पटांची निर्मिती केली आहे .मराठी टायगर्स या चित्रपटातील आणि राजा शिव छत्रपती या सिरियल मधील अमोल कोल्हे यांचेसोबताची त्यांची भुमिका विशेष परिचीत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.