वडिलांसमोरच पोलिसाचा निर्घृण खून
गोंदिया : खरा पंचनामा
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शेत जमिनीच्या वादातून एका पोलीसाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेत मृताचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिरोली/महागाव येथील शेत जमिनीच्या वादावरून ही घटना घडली. विलास रामदास मस्के, (वय 41 वर्षे) असे मृत पोलीसाचे नाव आहे.
मृत नवेगावबांध येथे पोलीस दलातील सी 60 मध्ये कार्यरत होता. तर त्यांचे वडील रामदास मस्के (वय 72) गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृत आपल्या वडिलाबरोबर शेतात उंनाळी धानाची रोहनी करत असताना आरोपींनी त्या ठिकाणी येत विशाल आणि त्यांच्या वडिलासोबत वाद सुरू केला. हा वाद प्रचंड विकोपाला गेला. त्यानंतर आरोपींनी विलासला बेदम मारहाण सुरू केली. मृत विलास याला तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणामध्ये विशालचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी अभिषेक सिंह पवार (वय 39 वर्ष), जयकुमार सिंग पवार (वय 72 वर्ष), सुमित सिंह पवार (40), वैष्णव सिंह पवार (वय 36 ), नरेंद्र पवार (वय 43), जितेंद्र सोनाग्रे वय 26 (वर्ष सर्व रा. महागाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.