महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका अजून का नाहीत?
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महानगर पालिका व राज्यातील २४ महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम अजूनही का घेण्यात आल्या नाहीत? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला विचारला आहे. तसेच याबाबत प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका लिखित स्वरूपात स्पष्ट करावी, असे निर्देशही देण्यात आले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा प्रश्न पुढे आला आहे.
नियमितपणे दर पाच वर्षांनी निवडणुकींचा कार्यक्रम आखणे, या राज्यघटनेनं घालून दिलेल्या नियमाचं महाराष्ट्र निवडणूक आयोगानकडून उल्लंघन झाले आहे. तसेच, " आयोगाची ही कृती देशद्रोही प्रकारची आहे," या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत, मुंबईतील रहिवासी रोहन पवार यांनी उच्च न्यायालयात आयोगाविरोधात याचिका दाखल केलेली आहे.
उच्च न्यायालयाने न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणी सुनावणी झाली. निवडणूक आयोगाकडून अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्यांकडून उपस्थित केला गेला.
राज्यात आगामी काळात विविध निवडणुका पार पडणार आहेत. पुढच्या वर्षी लोकसभा, राज्यसभा व विधानसभेच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. मात्र याआधी मोठ्या महापालिकांच्या तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.