Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला पोलिसाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

महिला पोलिसाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक



नागपूर : खरा पंचनामा

बिहारमधील एका एका महिला पोलिस शिपायाची एकतर्फी प्रेमातून हत्या करून रेल्वेने पळून जाणाऱ्या दोघांना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

मोहमद हसन अर्शद (27), मोहमद सज्जाद सुफी (23, दोन्ही रा. कटीहार, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर आज पहाटे ही करवाई करण्यात आली. दोघांनाही न्यायालयाच्या आदेशाने बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

बिहारच्या कटीहार जिल्ह्यात राहणारी 21 वर्षीय महिला शिपाई आणि हसन यांच्यात मैत्री होती. मात्र काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हापासून युवतीने मैत्री तोडली. मात्र, हसन तिला त्रास देत होता. या वादातून त्याने सहा साथीदारांच्या मदतीने कोढा क्षेत्र भटवारा पंचायत जवळ महिला शिपायावर गोळीबार करून खून केला. या प्रकरणी कोडा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मात्र, हसन आणि सज्जाद पळून जाण्यात यशस्वी झाले.

दोघेही कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या एस-4 कोचमधून दिल्ली ते बेंगळुरू प्रवास करीत असल्याची माहिती बिहारचे पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यांना मिळाली. त्यांनी नागपूर लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांच्या मोबाईलवर दोघांचेही छायाचित्र पाठविले. काशिद यांनी लगेच पथकातील सदस्यांच्या व्हॉट्स अॅपवर छायाचित्रासह माहिती पाठविली. 

लोहमार्ग पोलिसांचे पथक संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या प्रतिक्षेत होते. पहाटे 3 वाजताच्या सुमारास गाडी नागपूर स्थानकावर पोहोचली. यावेळी पोलिस पथकासह आरपीएफ जवानांनी गाडीचा ताबा घेतला. प्रत्येक डब्याची झडती घेत असताना एस-4 कोचमधील 1 आणि 2 नंबरच्या बर्थवर संशयीत युवकांची चौकशी केली. छायाचित्र तपासले असता त्याच्यात समानता वाटल्याने दोघांनाही ताब्यात घेवून ठाण्यात आणले. चौकशीअंती महिला पोलिस शिपायाची हत्या करून पळून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काशिद यांनी लगेच ही माहिती बिहारचे पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यांना दिली. त्यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंग, पोलिस उपनिरीक्षक रूपक रंजन सिंग दोघेही नागपुरात पोहोचले. काशीद यांनी न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींना बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.