धक्कादायक : 16 वर्षांच्या मुलीने केला आई वडिलांचा खून
बुलंदशहर : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर पोलिसांनी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या खुनप्रकरणी ताब्यात घेतले आहे. मुलांशी बोलण्यास आईवडिलांनी विरोध केल्याने नशेच्या गोळ्या जेवणात मिसळून ते बेशुद्ध झाल्यावर कुऱ्हाडीने वार करून तिने आईवडिलांना संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शब्बीर (45) आणि त्याची पत्नी रिहाना ( 42 ) हे शिकारपूर पोलीस ठाणे हद्दीतील फारुखी नगर लाल दरवाजा परिसरात रहिवासी असणाऱ्या या दाम्पत्याचा खून त्यांच्याच मुलीने केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासात दाम्पत्याच्या 16 वर्षीय मुलीनेच दोघांचा खून केल्याचे समोर आले आहे. चौकशी आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने सांगितले की, ती मुलांशी बोलायची, त्यामुळे तिचे आई- वडील नाराज होते आणि त्यांनी तिला अनेकदा मारहाणही केली होती, त्यामुळे ती खूप नाराज होती. हत्येची माहिती देताना त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी तिने एका तरुणाकडून नशेच्या 20 गोळ्या मागवल्या आणि त्या तिने आई-वडिलांच्या जेवणात मिसळल्या, त्यानंतर ते बेशुद्ध झाले. यानंतर आरोपीने आई-वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले, त्यात दोघेही जागीच ठार झाले, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ज्या तरुणाने या मुलीला गोळ्या दिल्या होत्या, त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी गोळ्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर अंमली पदार्थ आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.