Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परवाना नूतनीकरणच्या 'खुशी'वरून वाढली धुसफूस!

परवाना नूतनीकरणच्या 'खुशी'वरून वाढली धुसफूस!



मुंबई : खरा पंचनामा

आज मार्चअखेर असल्याने सर्वच शासकीय कार्यालयात मोठी धावपळ सुरू आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. एका शासकीय विभागातील परवाना नूतनीकरण केल्यानंतर लायसेन्सिकडून मिळणाऱ्या 'खुशी'वरून जोरदार धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.

शासनाच्या सर्वच विभागांनी मार्च एन्डचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. नुकतेच एका विभागाच्या परवाना नुतनीकरणासाठी शुल्क वाढवण्यात आले होते. मार्च एण्ड जवळ आल्यानंतर ते काही टक्क्यांनी कमी करण्यात आले. त्यानंतर परवाना नुतनीकरणासाठी लायसेन्सिची धावपळ सुरू झाली.

दरवर्षी दिवाळीप्रमाणे परवाना नूतनीकरण झाल्यानंतर त्या भागातील अधिकाऱ्यांना 'खुशी' दिली जाते. शिवाय भागातील कर्मचारी, मुख्य कार्यालयातील लिपिक, शिपाई यांच्यापर्यंत ही 'खुशी' पोहोचवली जाते. मोठ्या आणि वरिष्ठ साहेबांनाही ती पोहोचवली जाते असा रिवाज असल्याची चर्चा आहे.  त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासोबतच 'खुशी' मिळत असल्याने सर्वच खुश असतात. 

मात्र यावर्षी 'खुशी' घेणारे संबंधित अधिकारी वरिष्ठ सोडून खालच्या लोकांना 'खुशी' द्यायलाच तयार नाहीत अशी त्या विभागात जोरदार चर्चा आहे. मार्च एंडची खुशी मिळत नसल्याने हा वाद आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.