Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळला : इचलकरंजीत 29 जणांवर गुन्हा

पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळला : इचलकरंजीत 29 जणांवर गुन्हा



इचलकरंजी : खरा पंचनामा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीने आणि मित्र पक्षाने एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे इचलकरंजीमध्ये वातावरण तापले आहे. पुतळा जाळल्या प्रकरणी 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली, त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्यावरील कारवाई जोपर्यंत मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काँग्रेसकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

दुसरीकडे भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधातही आंदोलन पुकारले आहे. तर आता महाविकास आघाडीने राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आता तीव्र आंदोलन छेडले आहे.

इचलकरंजी येथे झालेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा या पक्षांतील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नेरंद्र मोदी यांचा पुतळा जाळला होता. त्यामुळे आता शहरातील महाविकास आघाडीच्या 29 जणांवर गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला व रस्ता अडवून धरल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या खासदारकी गेल्यामुळे केले इचलकरंजीतील मलाबादे चौकामध्ये निदर्शने करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.