Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांना मदत करून त्यांच्याशी सुसंवाद ठेवा : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आवाहन

पोलिसांना मदत करून त्यांच्याशी सुसंवाद ठेवा : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आवाहनसांगली : खरा पंचनामा

नागरीकांनी पोलीसांशी संपर्क ठेवुन पोलीसांना मदत करत रहावी व त्यांचेशी सुसंवाद ठेवावा असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले. तसेच फुलारी यांनी पोलीसांना मदत करणाऱ्यांचे आभार मानून तर उत्कृष्ठ कामगिरी करणारे पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले. 

सांगली जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षणा दरम्यान सुनिल फुलारी यांच्या उपस्थितीत जनतेशी सुसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना धन्यवाद देवून पोलीसांना आपले मित्र समजावे व तक्रारी निःसंकोचपणे दयाव्यात. पोलीस जनतेच्या मदतीसाठी व संरक्षणसाठीच असतात असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला जिल्हयात चोरी, जबरी चोरी, असे दाखल असले गुन्हयातील जप्त केलेला सोन्याचा सुमारे १३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल संबंधीत फिर्यादी यांना महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे हस्ते परत करण्यात आला. त्यावेळी फिर्यादी श्रीमती सुनिता कुलकर्णी व श्रीमती दिप्ती माळी यांनी पोलिसांनी त्याचे दागिने परत दिलेबद्दल आभार मानले. पोलिसांना मदत करणारे विविध घटकातील प्रतिष्ठीत नागरीक यांचा प्रशंसापत्र देवून सत्कार करण्यात आला.

हेमंत महाबळ, उद्योजक गिरीष चितळे, डॉ. रविकांत पाटील, डॉ. विनोद परमशेट्टी, श्रीकांत तारळेकर यांनी पोलीस कल्याण विभागाला महिला पोलीस अंमलदार व पोलीस कुटुंबातील मुलींसाठी कर्करोग प्रतिबंधक लस देणेकरीता वेळोवेळी केलेल्या मदतीबद्दल पोलीस खात्याने कृतज्ञता व्यक्त केली

पोलीस नाईक अनिल कोळेकर यांनी मिरज ग्रामीण सांगली ग्रामीण, सांगली शहर, शिराळा पोलीस ठाणे या विविध किचकट पुरावा नसलेले व क्लिष्ट गंभीर गुन्हे कौशल्याने तपास करुन उघडकीस आणलेल्याबद्दल तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील पो. कॉ. वसंत कांबळे, आटपाडी पोलीस ठाणेकडील नितिन लोखंडे, तुकाराम ढाले, भिलवडी पोलीस ठाणेकडील व्ही. एस. टिंगरे, सांगली शहर पोलीस ठाणेकडील शिवलींग मगदूम यांनी डायल ११२ या कॉलला तात्काळ प्रतिसाद देवून जलदगतीने घटनास्थळी जावून अत्यावस्थ असणारे लोकांना मदत करुन तातडीने उपचार देवुन त्यांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सर्व पोलीस अंमलदार यांचा फुलारी यांचे हस्ते प्रशंसापत्र देवुन सत्कार करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.