राज्य फुटबॉल संघात मिरजेच्या जेम्स स्मितची निवड : पालकमंत्र्यांच्यहस्ते सत्कार
मिरज : खरा पंचनामा
मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील परिचारक जेम्स स्मित याची राज्य फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. याबद्दल शनिवारी कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
ओडिशा येथील भुवनेश्वर येथे दि. 18 ते 23 मार्च दरम्यान अखिल भारतीय नागरी सेवा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडीसाठी नुकतीच चाचणी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये स्मित याची निवड झाली आहे.
याबाबत सचिवालय जिमखानाकडून मिरजेच्या शासकीय रुग्णालयास पत्र पाठवून कळवण्यात आले आहे. स्मित याची राज्य संघात निवड झाल्याने आज पालकमंत्री खाडे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुशांतदादा खाडे, फुटबॉल कोच प्रभात हेटकाळे, बाळासाहेब आळतेकर आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात जिल्ह्यातून केवळ स्मित याची निवड झाल्याने त्याचे अभिनंदन केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.