Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कसब्याच्या पराभवाचे पोस्टमार्टेम केले : फडणवीस

कसब्याच्या पराभवाचे पोस्टमार्टेम केले : फडणवीसपुणे : खरा पंचनामा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच पुणे दौऱ्यावर आले. यावेळी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवावर पक्षांतर्गत काही चर्चा झाली का किंवा शहर पातळीवर बदल होणार आहेत का? असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, एखादी निवडणूक जिंकलो किंवा हारलो तर त्याने काही फारसा फरक पडत नाही.

मात्र विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याच मुल्यमापन करतो किंवा दुसऱ्या भाषेत सांगायच झाल्यास त्याचं पोस्टमार्टम करीत असतो. ते आम्ही केल असून त्या योग्य आम्ही काळजी घेऊ असे फडणवीस म्हणाले.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामे झाले नाही. त्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याची सुरवात देखील झाली आहे.

तसेच सर्वांचे पंचनामे होण्यास थोडा वेळ लागणारच आहे. एखाद्याने नुसता फोटो जरी काढला तरी आम्ही त्याला पंचनामा म्हणू, तसेच मला विरोधी पक्षाच आश्चर्य वाटते. आम्ही त्यांच्या काळातील पैसे देत आहोत, आता रात्री पाऊस पडला तर ते सकाळी हंगामा करण्यास सुरुवात करतात. हे योग्य नाही असेही फडणवीस म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.