मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला!
मुंबई : खरा पंचनामा
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला.
संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यालर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या हाताला लागलं आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.
1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.