रूग्णवाहिकेच्या टायर, ट्यूब चोरणाऱ्यास अटक : सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे बीव्हीजी ग्रुपच्या रूग्णवाहिकांच्या ११ टायर आणि ट्यूब चोरणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.
आकाश रामा गगनमल्ले (वय २२, रा. विठ्ठलनगर, कर्नाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी एक पथक तयार केले होते. सोमवारी कर्नाळ येथील बीव्हीजी ग्रुपच्या रूग्णवाहिकांच्या देखभाल, दुरूस्ती सर्विस स्टेशनमधून अज्ञाताने ११ टायर आणि ट्यूब लंपास केल्या होत्या. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पथकाला ही चोरी आकाश गगनमल्ले याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ६० हजार रूपये किमतीच्या टायर ट्यूब जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, धनंजय चव्हाण, रमेश कोळी, संतोष माने, सचिन मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.