अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आळते येथील एकास २० वर्षे कारावास
सांगली : खरा पंचनामा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.
सुनिल सुभाष जाधव (रा. आळते, ता. तासगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पिडीत मुलगी ही संध्याकाळी घरातून बाहेर पडली ती परत आली नाही. नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु ती सापडली नाही. त्यामुळे, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यानच्या काळात सुनील याने पिडीत मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.
मुलगी अज्ञान आहे, हे माहित असताना देखील तिला ठिकठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सरकारपक्षातर्फे ही बाब न्यायालयात सिद्ध करण्यात आली. तसेच सुनील विवाहीत आहे, तरीही त्याने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याची बाब लक्षात घेऊन न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताना न्यायाधीश हातरोटे यांनी असेही नमूद केले की, अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा करण्याचे धाडस समाजात होऊ नये यासाठी ही अशी कडक शिक्षा देणे आवश्यक आहे.
महिला सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करुण दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलगी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. कुंडल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी युवराज
सरनोबत, कर्मचारी संभाजी शिंदे, विनोद कांबळे, पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, गणेश वाघ, सुप्रिया भोसले, सुनीता आवळे यांचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य मिळाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.