Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खूप लोकांनी तंग केलंय, पण ...

खूप लोकांनी तंग केलंय, पण ...मुंबई : खरा पंचनामा

आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपने यंदा दिमाखदार होळी साजरी केली. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मोहित कंबोज, तसेच इतर भाजप नेत्यांनी विशेष होलिकोत्सवाचं आयोजन केलं होतं. भाजप नेत्यांनी यावेळी मनसोक्त गुलालाची उधळण करत होळी खेळली. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला होळीनिमित्त संदेश दिला. विरोधकांचा बदला घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं. तसेच संजय राऊत यांच्यावरही खोचक टीका यावेळी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं होतं, मी बदला घेणार. आजही त्यांनी या वक्तव्याची आठवण केली. ते म्हणाले, खूप लोकांनी तंग केलंय. मी स्वतः विधानसभेत म्हटलं होतं, बदला घेणार. तो बदला म्हणजेच मी सगळ्यांना माफ केलंय. आमच्या मनात काहीच कटूता नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.

संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. एखाद दिवस ठिक आहे. उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम, असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीस म्हणाले, काही मित्रांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजून दिली होती. त्यानंतर त्यांच्यापैकी दिवसभर कुणी गाणं म्हणत होतं. कुणी बोलत सुटले होते. पण असा नशा करण्यापेक्षा भक्ती, संगीत, कामाचा नशा करावा, असेही फडणवीस म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.