बहुचर्चित, सुंदर महिला पोलिस अधिकाऱ्याला अटक
दिल्ली : खरा पंचनामा
सोशल मीडियावर आपला फिटनेस आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियात लोकप्रिय झालेली पोलीस अधिकारी नैना कंवल सध्या अडचणीत सापडली आहे. तिला अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नैना कंवल दिसल्यानंतर तिची जोरदार चर्चा झाली होती. नैना कंवलवर अपहरण आणि बेकायदा शस्त्र बालगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
हरियाणाच्या सोनपीत इथली नैना कंवल आंतरराष्ट्रीय स्तरावरची रेसलर आहे. एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. तसंच 6 वेळा भारत केसरी आणि 7 वेळा हरियाणा केसरीचा मान तिने पटकावला आहे.
क्रीडा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीनंतरही तिला हरियाणामध्ये नोकरी मिळाली नाही.
2022 मध्ये तिला राजस्थान सरकारमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून उपनिरीक्षक पदाची नोकरी मिळाली. दिल्ली पोलिस एका अपहरणाच्या प्रकरणात तपास करत असताना त्याचे धागेदोरे नैना कंवलपर्यंत येऊन पोहोचले. दिल्ली पोलिसांनी नैनाच्या रोहतकमधल्या फ्लॅटवर छापा मारला. तिच्या घरात पोलिसांना बिना लायसन्सची दोन पिस्तुलं सापडली. पण पोलिसांना बघताच नैनाने घराच्या खिडकीत पिस्तूल खाली फेकून दिलं. पोलिसांनी ही पिस्तुलं जप्त केली.
त्यानंतर या प्रकरणात नैनावर अवैध शस्त्र ठेवल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर नैना कंवलला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला तुरुगात टाकण्याची शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.