Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी ईडीच्या दारात!

मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी ईडीच्या दारात!



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे कागल विधानसभा मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी कागलमधील हजारो शेतकरी आज मुंबईत ईडीच्या दारात दाखल झाले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कागलमधील संजय चितारी आणि युवराज पाटील यांच्यासह हजारो शेतकरी ईडीच्या दारात दाखल झाले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावरून मुरगुड पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी कागल तालुका तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकरी ईडीच्या दारात पोहोचले.

मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेल्या विवेक कुलकर्णीसह 16 जणांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ईडी कार्यालयावर धडक मारली. यापूर्वी, विवेक कुलकर्णीविरोधातही खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व दाखल गुन्ह्यांचा आणि तक्रारींचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, ईडीच्या छाप्यानंतर अडचणीत आलेल्या मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. मुरगूडमध्ये दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दुसरीकडे हसन मुश्रीफांवर सातत्याने आरोप केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने तगडा झटका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.