Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या पुण्यातील दोघांना अटक, तीन काडतुसेही जप्त

सांगलीत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या पुण्यातील दोघांना अटक, तीन काडतुसेही जप्त 



सांगली : खरा पंचनामा

शहरातील बसस्थानक परिसरात विनापरवाना असेले देशी बनावटीची पिस्तूल बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आलेल्या पुण्याच्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन काडतुसे, दोन मोबाईल असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले. 

अविनाश बाबासाहेब भालेराव (वय २४, रा. जुनी सांगवी, पुणे), ऋषिकेश किसन पवार (वय २३, रा. धायरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी विनापरवाना घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानुसार पथक सांगली शहरात गस्त घालत असताना दोघेजणे पिस्तूल विक्री करण्यासाठी बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचला. त्यावेळी बसस्थानकासमोरील एका दुकानासमोर दोघेजण थांबल्याचे तसेच त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पथकाला आढळले. त्यानंतर पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे आढळली. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. 

शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय कार्वेकर, उपनिरीक्षक महादेव पोवार, विनायक शिंदे, संदीप पाटील, सचिन शिंदे, झाकीर काझी, अभिजित माळकर, अंकुश कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.