Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कार्यालयात खुर्चीवर बसण्याच्या वादातून थेट सहकाऱ्यावर केला गोळीबार!

कार्यालयात खुर्चीवर बसण्याच्या वादातून थेट सहकाऱ्यावर केला गोळीबार!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

येथील गुरुग्रामच्या एका कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला. त्यामुळे एका कर्मचाऱ्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट आपल्या सहकाऱ्यावरच गोळी झाडली. बुधवारी सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतर हा प्रकार घडला.

या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं. गोळी झाडणारा तरुण पसार झाला आहे.

ऑफिसात दोन कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे दुसरा कर्मचारी प्रचंड संतापला होता. आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाल्याने त्याने सहकाऱ्याला रमाडा हॉटेलजवळ गोळ्या घातल्या. त्यामुळे गोळी लागल्याने हा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमन जांगडा हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर पीडित तरुणाचे नाव विशाल (वय 23) असे असून तो गुरुग्राम सेक्टर 9 मधील फिरोज गांधी कॉलोनीतील रहिवाशी आहे.

विशाल आणि आरोपी अमन जांगडा यांच्यात मंगळवारी खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. दोघांनीही एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा या दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी दोघेही ऑफिस सुटल्यावर बाहेर पडले. रस्त्यावरून जात असताना अमन पाठिमागून आला. आणि त्याने विशालवर गोळी झाडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.