Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरट्या महिलेकडून साडेचार लाखांचे दागिने जप्त : सांगली शहर पोलिसांची कारवाई

चोरट्या महिलेकडून साडेचार लाखांचे दागिने जप्त : सांगली शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

लोकांशी ओळख वाढवून, मैत्री करून विश्वास संपादन केल्यानंतर चोरी करणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली. त्या चोरट्या महिलेकडून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.

मीना शीतल भट्टड (वय 42, रा. गावभाग, सांगली) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सुनीता कुलकर्णी (वय 68, रा. मध्यवर्ती बसस्थानक जवळ) यांनी फिर्याद दिली होती. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरीतील गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरचे निरीक्षक देशमुख यांनी एक पथक तयार केले होते.

पथकातील सपना गराडे यांना गस्त घालत असताना मीना हिचा संशय आला. त्यांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. तिला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर तिने चोरीची कबुली दिली.

कुलकर्णी यांच्याशी ओळख वाढवून, मैत्री करून मीनाने त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांच्या घरात बारीक लक्ष ठेवून तेथील दागिने चोरल्याची कबुली तिने दिली. तिच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, महादेव पोवार, विनायक शिंदे, सपना गराडे, झाकीर काझी, गुंडू दोरकर, सचिन शिंदे, अभिजित माळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.