Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी



पुणे : खरा पंचनामा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीचा अपवाद वगळता हेमंत रासणे यांना एकदाही धंगेकर यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेता आली नाही.

कसब्यातील ही लढत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने यांच्यात झाली. सोळाव्या फेरीत धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. 

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत. मात्र अजूनही धंगेकर यांच्या विजयाची घोषणा निवडणूक यंत्रणेकडून अधिकृतपणे करण्यात आली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.