Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटील यांच्या स्मितहास्याने हुतात्मा गटाचे कार्यकर्ते आक्रमक

जयंत पाटील यांच्या स्मितहास्याने हुतात्मा गटाचे कार्यकर्ते आक्रमकसांगली : खरा पंचनामा 

वाळवा येथील पाणी पुरवठा योजनेच्या उद्धटनावेळी आज चांगलाच तणाव निर्माण झाला होता. हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहून जयंत पाटील यांनी स्मितहास्य केल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांना आक्रमक कार्यकर्त्यांना सावरताना तारेवरची कसरत करावी लागली.

आज माजी मंत्री, आमदार जयंत पाटील वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.  वाळव्यामध्ये त्यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन झालं. मात्र या भूमिपूजनाला हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. जयंत पाटील यांचा काहीही संबंध नसतांना त्यांच्या हस्ते भूमिजूजन झाल्याचा राग हुतात्मा गटामध्ये होता.

आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवले. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलकांकडे बघून एक स्मितहास्य केलं. त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात झाली. आंदोलकांकडे बघून पाटलांनी स्मितहास्य केल्याची चर्चा सुरु झाली. याबाबचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान, आक्रमक झालेले आंदोलक पोलिसांना आवरत नव्हते. पोलिसांनी मोठ्या कष्टाने वाद टाळला. यावेळी राष्ट्रवादी आणि हुतात्मा गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. कार्यक्रमानंतर जयंत पाटलांना सुरक्षेसह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.