Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

औषधांच्या नावाखाली गोवा दारूची वाहतूक : 86 लाखांचा मुद्देमाल जप्त

औषधांच्या नावाखाली गोवा दारूची वाहतूक : 86 लाखांचा मुद्देमाल जप्तपिंपरी : खरा पंचनामा

औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा डाव राज्य उत्पादन शुल्कच्या पुण्यातील तळेगाव दाभाडे विभागाने हाणून पाडला. गोव्याहून कंटेनर भरून आलेला ६६ लाख रुपयांच्या विदेशी दारूचा साठा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पकडला. याप्रकरणी राजस्थान येथील चालकाला अटक करण्यात आली आहे.

शंकरलाल नारायण जोशी (वय ४६, रा. राज्यस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार ओमपुरी पसार झाला आहे.

कर्नाटकातील बंगळुरू येथून ही दारू सीलबंद कंटेनरमधून नगरला नेण्यात येत होती. मात्र, कंटेनरमध्ये औषधे असल्याची कागदपत्रे बनिवण्यात आली होती. सीलपॅक कंटेनरमध्ये सहसा कस्टमचा माल असतो, म्हणून त्याची तपासणी न करता तो सोडला जातो. मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोमाटणे टोलनाक्याजवळील हॉटेल सॉमटनसमोर ही कारवाई करण्यात आली. तर गोवा बनावटीची विदेशी दारू आणि बिअरचे 845 बॉक्स तमिळनाडूत नोंद दहाचाकी कंटेरनमधून (टीएन 69 बीबी 2523) हस्तगत करण्यात आले. 66 लाखांची दारू आणि कंटेनर असा 86 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक दिपक सुपे, प्रियंका राठोड, सागर धुर्वे, आर.सी. लोखंडे तसेच जवान तात्याबा शिंदे, राहूल जौंजाळ, संजय गोरे या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.