काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी सतेज उर्फ बंटी पाटील
मुंबई : खरा पंचनामा
माजी गृह राज्यमंत्री विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटिल यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली.
सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्हयात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. 2010- 14 च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन या विभागाचे मंत्री म्हणून काम केले आहे.
काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो, असे सतेज पाटील निवडीनंतर बोलताना म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.