Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गेट वे ऑफ इंडियाच्या दर्शनी भागाला तडे!

गेट वे ऑफ इंडियाच्या दर्शनी भागाला तडे!



मुंबई : खरा पंचनामा

मुंबई शहराचा मानबिंदु म्हणून गेट वे ऑफ इंडियाकडे बघितलं जातं. 113 वर्षांपासून समुद्राच्या लाटा आणि वादळांचा सामना करत ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. मात्र, याच गेट वे ऑफ इंडियाच्या दर्शनी भागाला तडे गेले आहेत.

113 वर्ष जुन्या गेट वे ऑफ इंडिया या वास्तूला तडे गेल्याचं समोर आले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये तडे पडल्याचं निष्पन्न झाले आहे. 'गेट वे ' च्या जिर्णोधाराचा प्रस्ताव सरकार मान्य करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू फक्त मुंबईचीच नाही. तर अवघ्या देशाची ओळख. 1911 साली इंग्रजांनी या वास्तूची निर्मिती केली. आणि 1924 साली सर्वसामान्यांसाठी खुली केली. पण, 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वास्तूला तडा गेलाय. मुंबई जवळून जाणाऱ्या प्रत्येक चक्रीवादळावेळी गेट वेनं उंच उंच लाटा झेलल्या.. पण, यावेळच्या वादळानंतर एक महत्वाची गोष्ट निदर्शनास आली. ती म्हणजे गेल्या वर्षीच्या चक्रीवादळात वास्तूचं नुकसान झाल्याचं दिसलं. याप्रकरणी मागील आठवड्यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

नुकतंच गेट वे ऑफ इंडियाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. त्याच ऑडिटनुसार इमारतीवर दर्शनी भागात तडे पडल्याचे दिसलं. वास्तूवर अनेक ठिकाणी वनस्पतींही वाढल्याचं दिसलं. दुसरीकडे, डोममधील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचे देखील नुकसान झालं आहे.

त्यानंतरच राज्याच्या पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनालयानं 6.9 कोटींचा जीर्णोध्दारासाठीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केलाय. जो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.  इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या भेटीस्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारलं गेलं होतं. भारताचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या ह्या शहरानं ही वास्तू जपली आहे. अनेक चित्रपटातून ही वास्तू लोकांच्या घराघरात आणि मनात देखील पोहोचली. मात्र, सध्या ही वास्तू धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल समोर आलाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.