Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार!

हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार!



कोल्हापूर : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेली तक्रार व ईडीच्या कारवाईनंतर आता जिल्हा बँकेचीही चौकशी केली जाणार आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना व ब्रिस्कसंदर्भात झालेल्या तक्रारी आणि त्याबाबत बँकेने दिलेली कागदपत्रे यामध्ये स्पष्ट तपशील लेखापरीक्षण अहवालात नसल्याचा ठपका जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या अहवालात ठेवला आहे. याच धर्तीवर डी. टी. छत्रीकर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) यांची चौकशीसाठी लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चाचणी लेखापरीक्षण करून त्याच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व संबंधित कागदपत्रांसह अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँकेने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला तसेच ब्रिस्क फॅसिलिटीज् कंपनीला दिलेल्या कर्जासंबंधी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमांचा व बँकेचा संबंध आहेत का या तीन बाबींचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे सोमय्या यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकचे विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी डी. टी. छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

ईडीने जिल्हा बँकेविरोधात ईडीने केलेल्या कारवाईबाबत किरीट सोमय्या यांनी दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. यामध्ये 39 हजार 53 शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपये मुदत ठेव विशिष्ट काळासाठी घेण्यात आली आहे त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या सर्व तक्रारींची आणि कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा बँकेला भेट दिली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.