Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जादूटोणा करणाऱ्या दोन मांत्रिकाना अटक

जादूटोणा करणाऱ्या दोन मांत्रिकाना अटक



सातारा : खरा पंचनामा

सातारा जिल्ह्यातील सुरूर येथील धावजी पाटील मंदीरात घडलेल्या जादूटोणा प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात भुईज पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणातील संशयित पसार झाले होते मात्र त्यांना पकडण्यात भुईज पोलिसाना यश आलं आहे.

सुरूर येथे 25 फेब्रुवारीला धावजी पाटील मंदीरात संध्याकाळी सातच्या दरम्यान दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाने मंदीरात सुरु असलेला अघोरी उपचार व गुलालाचे रिंगणात ठेवलेले साहित्य लिंबू, तसेच त्या लिंबाला टाचण्या टोचून त्यातील रस समोर बसलेल्या अनोळखी इसमाच्या तोंडात ओतून त्याला घाणरेड्या शिव्या देत असल्याचे रेकॉर्डिंग मोबाईलमधे केले होते. त्याद्वारे भुईज पोलिसांत जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत चार जणांविरुद्ध फिर्याद दिली होती.

यांनतर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार, अज्ञात मात्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित अनोळखी असल्याने त्यांना पकडणे हे पोलीसांच्या समोर आव्हानच होते. भुईज पोलीसांनी एक विशेष पथक तयार करून धावजी पाटील मंदीर परिसरातील सी. सी. टिव्ही फुटेज आणि काही गोपनीय माहितीद्वारे संशयितांना ताब्यात घेतलं. दिगंबर कोंडिवा शिंदे (वय 57 ) आणि सोमनाथ दिनकर पवार (वय 53) अशी त्यांची नावे आहेत. ते पुणे शहरातील बुधवार पेठ येथील आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.