Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भरती सुरू आहे, ओहोटी येऊ शकते : राज ठाकरेंचा भाजपला इशारा

भरती सुरू आहे, ओहोटी येऊ शकते : राज ठाकरेंचा भाजपला इशारा



मुंबई : खरा पंचनामा

2014, 2019 च्या मोदीच्या लाटेत काँग्रेसच काय झालं? १७ वर्षात मला विचारतां काय झालं? त्या काँग्रेसला विचारा. भाजपने लक्षात ठेवावे आज भरती सुरू आहे ओहोटी येऊ शकते, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला दिला.

22 तारखेला गुढी पाडव्यानिमित्त मनसेची सभा होणार आहे, या सभेमध्ये मशिदींवरच्या भोंग्याबाबत बोलणार आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये एवढं काम केलं, लोकांना नेमकं काय हवंय? नाशिक मध्ये जेवढं काम झालं तेवढं 25 वर्षात काम झालं नाही. 5 वर्षात कोणावरही भ्रष्टाचार चा आरोप झाला नाही. आता नाशिकमधले काही जण हळहळतायत, पण निवडणुकीवेळी हळहळतील का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

'काही जण बोलतात, पक्ष सोडून गेली, मग लोक विचारतात सभेला गर्दी कशी होते. मग 13 आमदार काय सोरटवर निवडून आली होती का? सोरटपण लोकांना कळतं. असो. मुळात हा प्रोपोगंडा आहे. जाणून बुजून प्रचार सुरू आहे, असे ठाकरे म्हणाले.

अनेक विषय मी २२ तारखेला बोलेन. जे पक्ष सोडून गेले ते एक एकटे गेले. मनसेने जेवढी राजकीय आंदोलने घेतली तेवढी कोणी घेतली नाहीत. मशिदीवरील भोंगे बाबत २२ तारखेला बोलेन. पाण्याचा प्रश्न नाशिक मध्ये सोडवला. मोबाईलवर मराठी मनसेमुळे ऐकु आलं. हात सोडून सांगितले मग थेअटर्स वाले ऐकु लागले. हिंदुत्वाला मानता म्हणजे नेमकं काय असंत तुमचं. भोंगा प्रकरणानंतर अयोध्येला विरोध करणारे हिंदुत्ववाले ज्यांनी हे सगळं केलं त्याचं पुढे काय झालं. १७ हजार सैनिकांवर केसेस टाकल्या, आमच्या वाटेला जायचं नाही. त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. आपण सत्तेपासून दूर नाही आहोत, मी आशा दाखवत नाही मला माहिती आहे ते कठीण आहे. पण महापालिका निवडणुका कधी होणार कळतं नाही आहे. नापास झालं असं वाटत आहे. महापालिकेच्या निवडणुका होऊ देत आपण सत्तेत असणार, असेही राज ठाकरे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.