Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर, नाशिकच्या दुचाकी चोरट्यांना तासगावमध्ये अटक

कोल्हापूर, नाशिकच्या दुचाकी चोरट्यांना तासगावमध्ये अटक



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यासह तासगाव परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या कोल्हापूर आणि नाशिक येथील दोघा अट्टल चोरट्यांना तासगाव पोलिसांनी अटक केली.

अजय बाळासो पटकरे (वय 39, रा. सदरबझार, कोल्हापूर), करण भगवंत जाखेरे (वय 20, रा. कचरवाडी, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तासगावचे पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तासगाव शहरात गस्त घालत असताना पथकाला बेंद्री चौक येथे दोघेजण दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्या परिसरात सापळा रचला. त्यावेळी दोघेही संशयित एक दुचाकी घेऊन थांबल्याचे दिसले. पथकाला संशय आल्याने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तासगाव शहर तसेच इतर ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून सव्वालाख रुपयांच्या चोरीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परीट, सोमनाथ गुंडे, समीर आवळे, सतीश खोत, दत्तात्रय जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.