Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साताऱ्यात घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक

साताऱ्यात घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक 



सातारा : खरा पंचनामा 

माण तालुक्यात सातारा एलसीबीच्या पथकाने सापळा रचून घरफोडीतील चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून 4 घरफोडी व 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 10 लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अमर देवगुडे (वय 26, रा. खोकडवाडी ता. जि. सातारा), संतोष सोनटक्के (वय 25, रा. भांडवली ता. माण जि. सातारा), विनोद खरात (वय 25, रा. श्रीनगर नवीन एमआयडीसी सातारा मुळ रा. भालवडी, ता. माण जि. सातारा) शशांक जाधव (वय 21, रा. खोकडवाडी ता. जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

दि. 25 मार्च रोजी एलसीबीचे पथक दहीवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना दहिवडीकडून साताराकडे टेम्पो (क्र. MH 11 DD 2334) व मारुती कार (क्र. MH 4 DJ4115) मधून चोरीचा माल घेवून काहीजण येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने पिंगळी फाटा येथे सापळा लावला. गाडी येताच त्यांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. 

ताब्यात घेतलेल्या चौघांकडून जनरेटर, फ्रिज, संगणक, प्रिंटर, सोफासेट, गॅस शेगडी, पितळी मुर्त्या, एलसीडी टीव्ही, पिठाची चक्की, सिलेंडर, उसाचे गुराळ, मोपेड मोटार सायकल, टेम्पो व अल्टो कार असा एकूण 10 लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

अटक केलेल्या चौघांवर रहिमतपूर, औंध, दहिवडी, सातारा तालुका, पुसेगांव, चिपळून पोलीस ठाणे अशा ठिकाणी एकूण 4 घरफोडीचे व 2 चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्यांचाही यावेळी पोलिसांनी उलघडा केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.