Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागरिकांच्या व्यथा समजावून घेऊन सौजन्यपूर्ण वागणूक द्या सांगलीत वार्षिक तपासणीवेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचना

नागरिकांच्या व्यथा समजावून घेऊन सौजन्यपूर्ण वागणूक द्या
सांगलीत वार्षिक तपासणीवेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचनासांगली : खरा पंचनामा

प्रत्येक पोलिस अधिकारी, कमर्चाऱ्याने त्याचे दैनंदिन कर्तव्य निपक्षपातीपणे पार पाडले पाहिजे. अधिकारी, अमलदार यांनी शिस्तबद्धरित्या गणवेश परीधान करणे आवश्यक आहे. नागरीकाशी सुसंवाद साधुन त्यांना सौजन्यपूर्ण वागणुक द्या. नागरिकांच्या व्यथा समजुन घ्या अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिल्या.

सांगली पोलीस दलाची फुलारी यांनी वार्षीक तपासणी केली. यावेळी आयोजित सैनिक संमेलनात त्यांनी या सूचना दिल्या. गुरुवारी त्यांच्याहस्ते मिरजेतील महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या अंकित रेल्वे स्टेशन रोड, पोलीस चौकीचे उदघाटनही करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली उपस्थित होते.

सोमवारपासून विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगली पोलीस दलाची सन २०२२ - २०२३ ची वार्षीक तपासणी सुरु केली आहे. गुरुवारी पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे वार्षीक निरीक्षण परेड घेण्यात आली. सदर वार्षीक निरीक्षण परेड करीता ३० पोलीस अधिकारी २०६ अमंलदार हजर होते. यामध्ये प्रथमताः सेरिमोनियल परेड घेण्यात आली. त्यानंतर कवायत प्रात्यक्षिकामध्ये पीटी परेड, लॉग पीटी, मेडीसिन बॉल, शस्त्र कवायत, संत्री डयुटी, आधुनिक शस्त्र हाताळणी, बेडी काढणी प्रात्यक्षिक, लाठी कवायत, स्कॉड ड्रिल, मॉब ड्रिल, बैंड प्रात्यक्षिक, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये कवायत शिक्षक प्रात्यक्षिकामध्ये समाविष्ठ अधिकारी व अमंलदार यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले.

निरीक्षण परेड संपल्यानंतर फुलारी यांनी पोलीस मुख्यालयास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सैनिक संमेलन घेण्यात आले. यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमलदार तसेच लिपीक कर्मचारी हे मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी फुलारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मिरज शहर हे अतिशय संवेदनशील आहे. तसेच शहरात रेल्वे जंक्शन असुन या ठिकाणी परराज्यातील नागरीकाची तसेच गुन्हेगार ये-जा होत असते. मिरज शहरात नामवंत डॉक्टर असुन मोठया प्रमाणात वैदयकीय सेवा पुरवली जाते. त्या करीता शहरात रेल्वे व एसटीने नागरीक येत जात असतात. रेल्वे स्टेशन एसटी स्टैंड जवळ जवळ आहे. सदर ठिकाणी रॉकेल डेपो झोपडपट्टी असुन त्या ठिकाणी गुन्हेगांराचा वावर असतो. तसेच शहरात येणारे नागरीकांना रेल्वे स्टेशन परीसरात वावरणारे गुन्हेगांरांकडुन त्रास दिला जात असलेल्या घटना घडलेल्या होत्या. तसेच सदर भागात असलेल्या हॉस्पीटलमध्ये येणा-या पेशंट नागरीकांना याचा त्रास होत असल्याने पोलीस ठाणेस तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या ठिकाणी पोलीसाची अत्यंत आवश्यकता असल्याने तेथे पोलीस चौकी स्थापन करणेचे गरजेचे होते. त्यावेळी मिरज शहरातील डॉक्टर, उदयोगपती, नागरिक, नगरसेवक याचे लोकवर्गणीतुन व उपमहापौर, सांगली मिरज कुपवाड मनपा आयुक्त याचे सहकार्याने जागा उपलब्ध करुन देऊन महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे अंकीत रेल्वे स्टेशन रोड, पोलीस चौकी स्थापन करण्यात आली. या चौकीचे उदघाटन फुलारी यांच्याहस्ते करण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.