Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान : महापौर सूयर्वंशी भारताचा मल्ल लढणार इराणच्या मल्लाशी

सांगलीत रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान : महापौर सूयर्वंशी
भारताचा मल्ल लढणार इराणच्या मल्लाशीसांगली : खरा पंचनामा

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विजयंत मंडळाकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि बिजली मल्ल माजी आमदार पै. संभाजी आप्पा पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी भारताचा मल्ल आणि इराणच्या मल्लाशी लढणार आहे. रविवार दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजता, सरकारी घाट आयर्विन पुलाजवळ या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर दिग्वीजय सुर्यवंशी आणि गटनेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर सुर्यवंशी म्हणाले, लाल मातीतील रांगड्या कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने महापौर चषक कुस्ती मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाची ही तिसरी महापौर चषक कुस्ती स्पर्धा आहे. रविवारी होणाऱ्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण तथा शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कुस्ती मैदानास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार राजू शेट्टी , महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपमहापौर उमेश पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, गटनेत्या भारती दिगडे, स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात एकूण 70  कुस्त्या होणार असून यामध्ये पुरुषांच्या 57 तर महिलांच्या 9 कुस्त्या होणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची प्रमुख कुस्ती पैलवान माऊली कोकाटे (हनुमान आखाडा, पुणे) विरुद्ध इराणचा नामवंत पैलवान हमीद इराणी यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान कार्तिक काटे (दावनगिरी कर्नाटक) विरुद्ध संतोष दोरवड (शाहू कारखाना) यांच्यात तर तिसरी प्रेक्षणीय कुस्ती पैलवान नाथा पालवे (पवार तालीम) विरुद्ध  पैलवान दादुमिया मुलाणी (कुर्डूवाडी) यांच्यात होणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या मल्लाला मानाची गदा, महापौर चषक व मानाचा पट्टा दिला जाणार आहे अन्य दोन प्रेक्षणीय कुस्तीतील विजेत्याना महापौर चषक, गदा, मानाचा पट्टा देऊन सन्मानित केले जाणार आहे. 

या कुस्ती स्पर्धेसाठी महापालिकेकडून १४ लाखांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये ९ लाखाची बक्षिसे असून उर्वरित खर्च हा नियोजनावर खर्च केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, पैलवान गौतम पवार, नगरसेवक संतोष पाटील, युवराज बावडेकर, जगन्नाथ ठोकळे उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.