Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संजय राऊत यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस

संजय राऊत यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 100 कोटींच्या मानहानीची नोटिस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या  'लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेश'नचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी संजय राऊत यांना ही नोटीस पाठवली आहे.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे - ठाकरे गटाकडून सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून रोज शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला जातो. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर खोचक शब्दात टीकाही अनेकदा केली आहे. दरम्यान याच टिकेवरून संजय राऊत यांना छत्रपती संभाजीनगरचे अमर विनायक लोखंडे यांनी 100 कोटींच्या मानहानीची नोटिस आपल्या वकिलामार्फत पाठवली आहे. ज्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत संजय राऊत यांनी वेळोवेळी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. 

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात चाटुगिरीचे वक्तव्य केल्याने समाजात त्यांचा अवमान झाल्याचा आरोप देखील लोखंडे यांनी या नोटीसमध्ये केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असल्याचा दावा नोटीस पाठवणारे अमर लोखंडे यांनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.