Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरगुती वीज दरात 6 टक्क्यांनी वाढ!

घरगुती वीज दरात 6 टक्क्यांनी वाढ!मुंबई : खरा पंचनामा

बँकिंग, सोने दरवाढीसह नागरिकांना वीजदरवाढीचा झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात मोठी वाढ केली आहे. महावितरण कंपनीने आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी हा भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वीजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

दरम्यान, या दरवाढीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडसह, बेस्ट, अदानी आणि टाटा पावर या कंपन्यांचा समावेश आहे. MSEDCL च्या ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ झाली आहे.

तर बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024- 25 साठी 12.2 टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के तर 2023-24 साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.

सध्या राज्यात उन्हाळा चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्यानं वीजेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. त्यास्थितीत महावितरणच्या कराराअंतर्गत विजेने कमाल मर्यादा गाठली आहे. परिणामी राज्य सरकारी कंपनीला किमान दोन हजार मेगावॉट वीज बाहेरून खरेदी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळं विजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.