Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल गांधी यांना जामीन मंजूर : 3 मे रोजी पुढील सुनावणी

राहुल गांधी यांना जामीन मंजूर : 3 मे रोजी पुढील सुनावणी



सूरत : खरा पंचनामा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी सूरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात मोदी आडनावावरून झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. यात राहुल गांधी यांच्यावतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. पहिला अर्ज हा शिक्षेला स्थगितीसाठी होता. हा नियमित जामीन अर्ज आहे. तर दुसरा अर्ज हा शिक्षेला स्थगितीचा होता. राहुल गांधींचा पहिला अर्ज न्यायालयाने मंजूर केला.

राहुल गांधींच्या दुसऱ्या अर्जावर न्यायालयाने मंजुरी दिली तर त्यांना पुन्हा खासदारकी मिळू शकते. मात्र यासाठी वेळ लागू शकतो. सूरतमध्ये न्यायालयात राहुल गांधी बहीण प्रियांका गांधी यांच्यासोबत पोहोचले होते. सोबत इतर काँग्रेस नेतेही उपस्थित होते.

अवमान याचिका प्रकरणी मिळालेल्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी सूरत सत्र न्यायालयात पोहोचले होते. त्यांच्या याचिकेवर सुनावणीनंतर १३ एप्रिलपर्यंत जामिनाची मुदत वाढवण्यात आली आहे. याशिवाय शिक्षेविरोधातील याचिकेवर ३ मे रोजी पुढची सुनावणी असणार आहे.

शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिल्यास राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा मिळू शकते. 'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे? असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन दिला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भाजप नेते आणि आमदार तसंच गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत हे वक्तव्य केलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.