Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुश्रीफ यांच्याशी संबंधित 9 व्यावसायिकांच्या घरी ईडीचे छापे

मुश्रीफ यांच्याशी संबंधित 9 व्यावसायिकांच्या घरी ईडीचे छापे



पुणे : खरा पंचनामा

पुण्यात आज सोमवारी सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील 9 बड्या व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी सकाळीच ईडीने शहरातील बड्या व्यावसायिकांवर छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच पुण्यातील 9 व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. सिंहगड रोड आणि शिवाजी नगर परिसरात हे व्यावसायिक राहतात. तिथेच त्यांचे कार्यालयही आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, तिथे सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुणालाही आत सोडण्यात येत नाही आहे. तसेच आतील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय या व्यावसायिकांच्या कुटुंबातील लोकांना कुणालाही फोन करण्यास मज्जाव करण्यात आलं आहे.

विवेक गव्हाणे, चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया या व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते. त्यामुळे दरम्यान, काल पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीने छापे टाकले होते. सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले होते. या प्रकरणी छापे टाकण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.