Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

40 वर्षे खासदारकी असतानाही पूल का केला नाही? : राजू शेट्टी

40 वर्षे खासदारकी असतानाही पूल का केला नाही? : राजू शेट्टी



कोल्हापूर : खरा पंचनामा

धैर्यशील माने यांच्या कुटूंबात जवळपास ४० वर्षे खासदारकी आहे. या ४० वर्षाच्या कारकिर्दीत यांना त्यांच्या जन्मगाव असलेल्या रूकडी गावात रेल्वे उड्डाणपूल व रूकडी -चिंचवाड पंचगंगा नदीवर पूल बांधणे शक्य झाले नाही. यामुळे स्टंटबाजी करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न माने कुटूंबियांनी करू नये असा टोल माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज लगावला.

ते म्हणाले, इचलकरंजी-कोल्हापूर व अर्जुनवाड-मिरज या मार्गावर असलेल्या रेल्वेमार्गावर २०१८ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नातून उड्डाणपूल मंजूर करून मी आणला. यापैकी इचलकरंजी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले असून विद्यमान खासदार धैर्यशील माने समर्थकामार्फत स्टंटबाजी करत श्रेय लाटण्याचे प्रयत्न करत आहेत, असेही शेट्टी म्हणाले.

शेट्टी म्हणाले कि, २००९ साली मी लोकसभेचा सदस्य झाल्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीपासून या कामासाठी  सातत्याने पाठपुरावा करत होतो. २०१८ साली  तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वरील दोन्ही कामांना मंजूरी दिली. त्यानंतर २०१९ साली या कामाची निविदा प्रसिध्द होवून कामास सुरवात झाले. महारेल कंपनीकडून सदर काम करत असताना याबाबत हलगर्जीपणा झाला. याबाबत वारंवार संबधित अधिकारी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे पाठपुरावा करून सदर कंपनीकडून काम करून घेण्यात आले, असेही माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.