Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चालत्या रेल्वेत पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळले : 8 प्रवासीही जखमी!

चालत्या रेल्वेत पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळले : 8 प्रवासीही जखमी!
कोझिकोड : खरा पंचनामा

केरळच्या कोझिकोड येथील इलाथूरजवळ अज्ञाताने धावत्या रेल्वेत एका महिलेवर पेट्रोल टाकून तिला जवंत जाळले. ही घटना अलप्पुझा - कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात रविवारी रात्री 10 वाजता घडली. या घटनेत आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

जखमी झालेल्या पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, इतर तीन जखमी लोकांना कोझिकोडच्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना इलाथूर पुलावर रेल्वे असताना घडली. अलप्पुझाहून कन्नूरला जाणारी एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेस कोझिकोड सेंट्रल स्टेशनवरून निघाली होती. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

रेल्वेमध्ये असलेल्या लोकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आठ जण जखमी झाले तर बाकीचे इतर डब्यात पळून गेले. तर आरोपीने ट्रेनमधून उडी मारून पलायन केले. आरपीएफ आणि कोझिकोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.