Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली महापालिका आयुक्तांच्या दिशेने फेकला बूट फाईल मंजूर न केल्याने कृत्य, एकजण ताब्यात

सांगली महापालिका आयुक्तांच्या दिशेने फेकला बूट
फाईल मंजूर न केल्याने कृत्य, एकजण ताब्यात

सांगली : खरा पंचनामा

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतफेर् सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकाने गेल्या ११ वषार्पासून त्याची फाईल मंजूर न केल्याने आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर महापालिकेचे सर्व कर्मचारी मुख्यालयात जमले होते. त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महापालिका कार्यालयात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ एकाला ताब्यात घेतले आहे. 

सांगलीतील कैलास काळे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. आज सोमवारी महापालिकेतर्फे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सांगलीतील मुख्यालयात हा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी कैलास काळेही उपस्थित होते. त्यांनी गुंठेवारी संदर्भात २०१२ मध्ये फाईल महापालिकेत दिली होती. ती मंजूर न झाल्याने ते संतप्त झाले. यावेळी आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी काळे यांचा वाद झाला. त्यानंतर काळे यांनी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख तातडीने फौजफाट्यासह महापालिकेत पोहोचले. त्यांनी काळे याला ताब्यात घेतले. दरम्यान आयुक्तांच्या दिशेने बूट फेकल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी या घटनेचा निषेध करत कामबंद आंदोलनाची घोषणा केली. यावेळी महापालिका परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. शिवाय महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांना भेटून पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख अधिक माहिती घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.