Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत बोलवले! : राजकीय घडामोडींना वेग

मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत बोलवले! : राजकीय घडामोडींना वेग







मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांना मुंबईत का बोलावण्यात आलं आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. एकंदरीत मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे मुंबईबाहेर असलेले सर्व मंत्री मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्यापूर्वी सर्व मंत्री मुंबईत हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मंत्र्यांना सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं मुंबईत हजर राहा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत.

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिमध्ये सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तातडीनं बैठक का बोलावण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. 

आमदारांच्या अपात्रेबाबतच निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता या बैठकीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश का दिले याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.