Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सिंचन घोटाळा गुंडाळला? : आरोप असणाऱ्या अभियंत्यांना मिळाली पदोन्नती

सिंचन घोटाळा गुंडाळला? : आरोप असणाऱ्या अभियंत्यांना मिळाली पदोन्नती मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना भाजपाने मोठ्या प्रमाणावर आरोप केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाचा शेवट झाला असल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यात गुन्हे दाखल झालेल्या दोन अधीक्षक अभियंत्यांनी मुख्य अभियंता पदावर पदोन्नती देण्याचे आदेश 'मॅट'ने दिले आहेत. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच सिंचन घोटाळा गुंडाळला गेला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

या घोटाळ्यातील दोषी ठरवलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढं (मॅट) याचिका दाखल केली होती. मॅटने सरकारला तीन वेळेस या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही सरकारने कोणतीही भूमिका, आपलं म्हणण सादर न केल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे निर्देश मॅटने दिले आहेत. 

सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला. गेली 9 महिने भाजप सत्तेवर आहे. मॅटच्या निर्णयामुळे आता हा सिंचन घोटाळा संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत गुन्हा दाखल होऊन पाच वर्षं झाली तरी आरोपपत्र दाखल न झाल्यानं मॅटने हा निर्णय दिला आहे. 

मात्र यामुळे सिंचन घोटाळा आणि अजित पवारांच्या अडचणी संपल्या काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी अधीक्षक अभियंते राजेश सोनटक्के यांच्यावर तीन, दुसरे याचिकाकर्ते कन्नाजीराव वेमूलकोंडा यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. या दोघांनी पदोन्नतीसाठी मॅटकडे धाव घेतली होती. नागपूर मॅटचे उपाध्यक्ष भगवान आणि सदस्य एम. ए. लोवेकर यांनी दोघांच्या याचिकांवर 24 नोव्हेंबर 2022, 12 डिसेंबर 2022, 4 जानेवारी 2023, 10 जानेवारी 2023 आणि 12 जानेवारी 2023 या पाच तारखांना सुनावणी घेतली. 

मॅटकडे याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात 2018 साली दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यांत पाच वर्षानंतर आरोपपत्र दाखल झालेले नाही. हे मॅटमध्ये सरकारी पक्षाने तोंडी सांगितले. सरकारचे म्हणणेच सादर झाले नाही त्यामुळे मॅटने दोघांना तात्पुरत्या पदोन्नतीचा एकतर्फी आदेश दिला अशी चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.