Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजाराम कारखाना निवडणूक : सतेज पाटील यांना तिसरा धक्का

राजाराम कारखाना निवडणूक : सतेज पाटील यांना तिसरा धक्का



कोल्हापूर : खरा पंचनामा

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेल्या २९ जणांची याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीला हा धक्का मानला जात आहे.

'राजाराम'च्या निवडणुकीत कारखान्याच्या पोटनिवडणुकीचा भंग केला म्हणून विरोधी आघाडीच्या २९ जणांचे ३० अर्ज व एक इतर अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी अपात्र ठरविले. याविरोधात प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे अपील केले होते, त्यावर सुनावणी होऊन सोमवारी त्यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. याविरोधात सोमवारी दुपारीच विरोधी आघाडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सकाळी सुनावणी झाली.

सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कारखान्याचा पोटनियमानुसार करार केलेल्या क्षेत्रातील ऊस पुरवठा करणे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकाला बंधनकारक असल्याचे सत्तारूढ आघाडीच्या वकिलांनी मुद्दा मांडला. यावर, न्यायालयाने विरोधी आघाडीची याचिका फेटाळून लावली. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक व उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी अपयश आल्याने सतेज पाटील यांच्या विरोधी आघाडीला हा धक्का मानला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.