बीबीसी इंडियावर ईडीकडून गुन्हा दाखल!
मुंबई : खरा पंचनामा
ईडीने बीबीसी इंडियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परकीय चलनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ब्रिटिश वृत्त समूहाशी संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपावरून बीबीसीवर ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टरवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आयकर विभागाच्या पथकाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांत छापे टाकून झडती घेतली होती.
बीबीसीने अलीकडेच 'India: The Modi Question' ही वादग्रस्त डॉक्युमेंट्री बनवली होती. यावर केंद्र सरकारने देशात बंदी घातली होती. या डॉक्युमेंट्रीमध्ये बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा डागाळल्याचा आरोप आहे. गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. यानंतरही बीबीसीने अशी डॉक्युमेंट्री तयार केल्याने एक मोठा वर्ग नाराज झाल्याचं बोललं जात होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
