Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कार, दुचाकीतील रोकड लंपास करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर येथील 6 गुन्हे उघड; सांगली एलसीबीची कारवाई

कार, दुचाकीतील रोकड लंपास करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर येथील 6 गुन्हे उघड; सांगली एलसीबीची कारवाईसांगली : खरा पंचनामा

कारच्या काचा फोडून तसेच मोपेडच्या डिकीतून रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 6 लाखांची रोकड, एक दुचाकी, विविध क्रमांकाच्या 4 नंबरप्लेट, चोरीचे साहित्य असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. दरम्यान त्याच्याकडून सांगली जिल्ह्यात तसेच इचलकरंजी, कोल्हापूर येथील एकूण 6 गुन्हे उघडकीस आल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

मधु भास्कर जाला (वय 25, रा. कपरालतिप्पा, आंध्रप्रदेश), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कार, दुचाकीतून रोकड चोरणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष पथक तयार केले होते.

पथकाला अशा प्रकारचे गुन्हे आंध्रप्रदेश येथील टोळीने केल्याची  माहिती मिळाली. तसेच या टोळीतील गुन्हेगार कुपवाड येथील हनुमाननगर येथे भाड्याच्या खोलीत रहात असल्याचीही माहिती मिळाली. पथकाने कुपवाड येथे छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये 6 लाखांची रोकड आढळली. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने कार, मोपेडमधून रोकड चोरल्याची कबुली दिली. तसेच साथीदारांच्या मदतीने इचलकरंजी, कोल्हापूर येथूनही रोकड चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली असून त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, जितेंद्र जाधव, संदिप पाटील, सागर टिंगरे, उदय माळी, विक्रम खोत, संतोष गळवे, संदीप नलवडे, सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

गुजरातमध्ये 4 गुन्हे दाखल
यातील संशयित मधु जाला हा आंतरराज्य रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुजरात येथील राजकोटमध्ये 4 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.